आपणां सर्वांनाच कसला ना कसला तरी नाद असतो…. पण काहींची ती व्याधी बनून जाते… एक Obsessive Compulsive Disorder (OCD)! आमच्या या सहा शिलेदारांना असाच कसला ना कसला नाद आहे. त्यांचं जिणं त्या नादापायी मुश्किल होऊन बसलंय. आणि ते आलेत डॉ. धुरंधर या प्रख्यात मानसतज्ञाकडे… इलाजासाठी. पण डॉ. तर विमानतळावर अडकलेयत…. आणि सहाही जणांच्या अपॉईटमेंट्स एकदमच झाल्यात ..... तीन वाजतां …! हे काय गौडबंगाल आहे? आणि यातून मार्ग कसा काढायचा? लरॉन्त बाफी यांच्या मूळ फ्रेंच कथेवरचं हे मराठी रूपांतर...... “नाद हा माझा”!!! खरंच, या नाटकाचे जागतिक शुभारंभाचे (World Premiers) प्रयोग सिनसिनाटीत होणार आहेत, कलासन्मान तर्फे…! शुभारंभाच्या प्रयोगातले सहा शिलेदार आहेत…. अभिजित भावसार, शिल्पा लोणी, वृंदा लेले, श्रुती भावसार, राज लोणी, आणि पराग कानविंदे…. आणि त्यांच्या अपॉईटमेंट्स एकदमच करून हा गोंधळ घडवून आणलाय मनीषा जोशी या डॉक्टरांच्या रिसेपशनिस्ट ने..... बघूया काय गोंधळ होतोय तो रंगमंचावर......
येत्या ७, ८, ९ मार्च रोजी .....तीन प्रयोगांनी सुरुवात…!